
गौरी गणपतीला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा मुसळधार पावसामुळे खोळंबा झाला आहे. बुधवारी रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी दादरहून सुटणारी दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही गाडी आज गुरुवारी साडे अकरा वाजता दादरहून सुटणार आहे. त्यामुळे तब्बल 12 तास उशिराने ही गाडी सुटणार आहे.
बुधवारी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वे ठप्प झाली होती. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला होता. 5 सप्टेंबर रोजीच्या 01035 पनवेल – सावंतवाडी, 01034 सावंतवाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गौरीगणपती सणाला चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येतात. पावसाने चाकरमान्यांचा खोळंबा केला. पावसामुळे दोन जादा गाड्या रद्द करण्यात आल्या असून तुतारी एक्सप्रेस 12 तास उशिराने सुटणार आहे.





























































