
मंगळवार-बुधवारी पावसानं झोडपल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसानं उसंत घेतली होती. मात्र गुरुवारी संध्याकाळपासून कल्याण-बदलापूरला पावसाने पुन्हा झोडपून काढायला सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं शुक्रवारी पहाटे काही वेळाची विश्रांती घेतली त्यामुळे नोकरदार वर्ग घराबाहेर पडला. पण आता पुन्हा एकदा कल्याण-विठ्ठलवाडी-उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस सतत सुरू राहिल्यास या भागातील रेल्वे वाहतुकीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.



























































