
शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा असलेल्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने आणि कोयना राधानगरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या धुवादार पावसाने तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ होउन कृष्णा पंचगंगा या दोन्ही नद्या पात्राबाहेर पडल्या असून येथील श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी येथे या मोसमातील तिसरा दक्षिणीद्वार सोहळा पार पडला. यावेळी अनेक भक्तगणांनी पुन्हा महापूर नको अशी प्रार्थना दत्तमहाराजांना करत या सोहळ्याचा लाभ घेतला. दरम्यान सतत पडणाऱ्या पाऊसामुळे नदीची पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांची पुन्हा धास्ती वाढली आहे.
शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरमध्ये पाणी शिरले असून या वर्षातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा गुरुवारी रात्री संपन्न झाला. तर कुरुंदवाड-शिरोळ जुना रस्त्यावरील अनवडी नाला, कुरुंदवाड-शिरढोण पूलावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे.
शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुराचे सावट अध्याप गडद असल्याने त्यातून नागरिक सावरले नाहीत आलेल्या महापुराने परिसरातील सुमारे 33 गावातील शेती, व्यापारी , घराचे व प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले अनेकांचे संसार या महापुरातून वाहून गेल्या असल्याने नागरिकांची आर्थिक हानी झाली आहे. पुराने शेकडो घरे पडल्याने अनेक कुटुंबे बेघर झाले असून ते त्यातून सावरलेले नाहीत पूर ओसरल्यानंतर शहरातील सर्व कुटुंबे घरे व साहित्य स्वच्छ करण्यात मग्न असतानाच पुन्हा पाऊसाने जोर धरला आणि पंचगंगा आणि कुष्णा नदीच्या पात्रात मोठी वाढ होऊ लागल्याने नदीकाठच्या गावांनी धास्ती घेतली आहे.




























































