
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान मॅच्येस्टरमध्ये सुरू असलेल्या अॅशेस कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूट एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्कने फेकलेला एक बॉल जो रूटच्या प्रायव्हेट पार्टला लागला. मिशेलने टाकलेला हा चेंडू 140 किमी प्रतितास एवढ्या वेगाचा होता. या बॉलचा फटका एवढा जबरदस्त होता की जो रुटने घातलेला एल गार्ड या फटक्याने तुटला आहे. एल गार्डचे दोन तुकडे झाले आहेत. या दुर्घटनेतून जो रुट थोडक्यात बचावला आहे.
जो रूटने एल गार्ड घातला नसता तर त्याला गंभीर इजा होण्याची शक्यता होती. एल गार्ड घातला असतानाही या बॉलचा फटका एवढा जोरदार होता की, त्यानंतर बराच वेळ जो रूट विव्हळत खेळपट्टीवर बसला होता. दुखणे कमी झाल्यावर त्याने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. इंग्लडची फलंदाजी सुरु असताना 39 षटकाच्या चौथ्या बॉलला ही घटना घडली.
मिशेलने टाकलेला जलद चेंडू रुटच्या बॅटला लागून त्याच्या प्रायव्हेट पार्टला लागला. या धक्क्याने रुट व्हिवळत खेळपट्टीवरच बसला. घटनेनंतर इंग्लंडच्या संघाच्या फिजिओ तज्ज्ञांनी खेळपट्टीकडे धाव घेतली. रुटने थोडे पाणी घेतले आणि खेळपट्टीवर पाय मोकळे केले. त्यानंतर एल गार्ड बदलून पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. बॉलच्या फटक्याने एल गार्डचे दोन तुकडे झाले. त्यावरून बॉलच्या गतीचा अंदाज येऊ शकतो, असे फिजिओ तज्ज्ञांनी सांगितले.
मॅच्येस्टरमध्ये सुरू असलेल्या अॅशेस कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मिशेल स्टार्कने फेकलेला एक बॉल इंग्लंडचा कर्णधार जो रूट प्रायव्हेट पार्टला लागला. या बॉलचा फटका एवढा जबरदस्त होता की जो रुटने घातलेला एल गार्ड या फटक्याने तुटला आहे. #Ashes2019 pic.twitter.com/5eKMeGz7vt
— Saamana (@Saamanaonline) September 7, 2019
ऑस्ट्रेलियाच्या डोंगराएवढ्या धावांच्या बदल्यात फलंदाजीला आलेला इंग्लंडचा संघ दबावाखाली खेळत होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्टेलियाने इंग्लंड संघावरील दबाव आणखी वाढवला होता. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने पाच गडी गमावत 200 धावांचा टप्पा गाठला होता. इंग्लंडचा संघ ऑस्टेलियापेक्षा 297 धावांनी पिछाडीवर होता. ऑस्टेलियाने पहिला डाव 8 गडी बाद 497 धावांवर घोषित केला होता. तिसऱ्या दिवशीच्या खेळात कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्स संघाचा डाव सावरत असतानाच ही घटना घडली. त्यांनी 141 धावांची भागीदारी केली होती. जो रुटने या डाव्यात 71 धावा केल्या. 168 चेंडूत त्याने 10 चौकार लगावले.


























































