गुड न्यूज, रविना टंडन आजी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन हीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रविना लवकरच आजी होणार आहे. रविनाची दत्तक कन्या छाया आई होणार आहे. रविनाने  नुकतेच आपल्या लाडक्या लेकीचे डोहाळे जेवण थाटात साजरे केले. यावेळी रविनाच्या जवळच्या मित्र मंडळी व नातेवाईकांनाच आमंत्रण देण्यात आले होते. रविनाने सोशल मीडियावर या प्रसंगाचे फोटो शेअर केले आहेत.

रविनाने 1995 साली छाया व पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होते. त्यावेळी पूजा 11 वर्षांची होती तर छायाचे वय 8 वर्ष होते. रविना आपल्या बिझी शेडयूलमध्येही आई म्हणून मुलींची व्यवस्थित काळजी घ्यायची. मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविनाने त्यांच्यासाठी योग्य स्थळे बघून त्यांची लग्नेही लावून दिली. आता आजी होणार असल्याने रविना भलतीच खुश आहे. आपला हा आनंद तिने मित्रांना शानदार पार्टी देऊन साजरा केला आहे.