परळी येथे 35 लाखाचा गुटखा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील मालिकपुरा भागात अंबाजोगाई येथे पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. या धडाकेबाज कारवाईत 35 लाखाचा गुटखा वाहनासह जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तीन दिवसापूर्वीच मोठी कारवाई केली होती. त्यानंतर गुटख्याच्या अवैध धंद्याविरुद्धची उपअधिक्षक राहुल धस यांनी सुरु केलेली मोहीम तीव्र झाली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलीस पथकाने एका कंटेनरमधून पांढर्‍या रंगाच्या बॅगा उतरत असताना छापा घातला.  त्यामध्ये गुटखा भरलेला आढळून आला. तसेच या वाहनाच्या चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चालक व्यंकटी लक्ष्मण फड (24) उखळी ता. गंगाखेड जि.परभणी याने सोलापूर येथून आणलेल्या गुटख्याच्या बॅगा पत्र्याच्या शेडमध्ये उतरवल्याचे सांगितले. त्यानुसार तपासणी केली असता मोठा गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला.

पुढील कारवाई अन्नभेसळ प्रतिबंधक विभाग बीड  हे गुटख्याची मोजदाद, नोंद करुन त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस उपाधिक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेंढके, सपोनि धस मॅडम, पोह बांगर, पोना केंद्रे, तोटेवाड, पो कॉ बुडे, चालक सपकाळ आदींनी केली.