विरार स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार ते चर्चगेट स्थानकादरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला असून ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने स्थानकांमध्ये तुफान गर्दी उसळली आहे.

तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. अनंत चतुर्दशीची सुट्टी संपल्यावर कामावर जाणाऱ्या तमाम मुंबईकरांचा स्थानकांवरच खोळंबा झाला आहे. ट्रेन्स जवळपास 30 ते 35 मिनिटे उशिराने धावत आहेत.