
इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण धुवावर पडलेला लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्या शोधासाठी आता अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. इस्रोच्या ऑर्बिटरने विक्रमचे थर्मिल फोटो पाठवल्यावर आता ‘नासा’चा ऑर्बिटरही विक्रमचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे.
चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान जिथे विक्रम लँडर पडला होता त्या चंद्राच्या दक्षिण भागावरून मंगळवार, 17 सप्टेंबरला नासा आपला ऑर्बिटर पाठवणार आहे. हा ऑर्बिटर विक्रमला शोधण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. इस्रोला विक्रमचा शोध लागला आहे. मात्र, त्याच्याशी संपर्क साधता आलेला नाही.



























































