ज्येष्ठ समाजसेवक अशोक वाकुडे यांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड शहरातील ज्येष्ठ समाजसेवक व कट्टर शिवसैनिक अशोक वाकुडे( वय 50 ) यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्याला ओळखले जात होते.

वाकुडे हे शहरातील आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतं. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण अशोक वाकुडे प्रामाणिकपणे राबवत होते, रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण झाली की ते तातडीने मदत करत. त्यांच्या या समाजसेवेमुळे ते जिल्ह्यात परिचित होते, त्यांच्या पश्चात पत्नी ,वृद्ध आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही घटनेची माहिती कळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.