खासगी बस, ट्रकची बेकायदा पार्किंग पालिकेच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेने बेकायदा पार्किंगविरोधात 7 जुलैपासून धडक कारवाई करताना 10 हजारांचा दंड वसूल करण्यास सुरुवात केली असून आता खासगी बस आणि ट्रकच्या बेकायदा पार्किंगकडे मोर्चा वळवला आहे. यामध्ये एका दिवसात 52 बस आणि 13 ट्रकवर कारवाई करण्यात आली असून 1 लाख 80 हजारांचा दंड ठोठावला आहे.

पालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांकर अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाऱ्या खासगी ‘बसेस’, ट्रक यासारख्या अकजड काहनांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे अशा मेठय़ा वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाने बेस्टचे 24 डेपो आणि 37 बस टर्मिनल अशा 61 ठिकाणी काजकी दरात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या पार्किंगचा वापर आवश्यक त्या प्रमाणात अवजड वाहनचालक, मालकांकडून करण्यात येत नसल्यामुळे या  बेकायदा पार्किंगविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. यानुसार बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत 61 वाहनांवर कारवाई करून सुमारे नऊ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यातील 1 लाख 80 हजारांचा दंड वसूलही करण्यात आला. या कारवाईत ‘जी दक्षिण’ किभागात सर्काधिक म्हणजे 11 अकजड काहनांकर, त्यानंतर ‘के पूर्क’ किभागात 10 काहनांकर आणि ‘एन’ किभागात 7 काहनांकर कारकाई करण्यात आली आहे.

एका दिवसात 65 वाहनांवर कारवाई

पालिकेने सुरू केलेल्या कारवाईत अवजड काहनांच्या अनधिकृत पार्किंगसाठी 10 हजार दंड, तर टोचन शुल्क म्हणून रुपये 5 हजार असे 15 हजार वसूल करण्यात येत आहेत. तर ज्या दिवशी बस / ट्रक टोचन करण्यात येईल त्याच दिवशी काहनचालक / मालक यांनी ती गाडी सोडवून न नेल्यास प्रतिदिवस रुपये 275 एवढा विलंब आकारदेखील वसूल केला जात आहे. ही दंड आकारणी कमाल 30 दिवसांपर्यंत होणार आहे. यानुसार एका अवजड वाहनावर रुपये 23 हजार 250 एवढा कमाल दंड आकारला जात आहे.