मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-heavy-rain

हवामान विभागाने गुरूवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. परंतु गुरूवारी पावसाने दडी दिली. आज शुक्रवारी सकाळ पासून मुंबई आण ठाणे परिसरात मुसळधार पावसाला पुन्हा सुरूवात झाली.

सकाळ पासून बरसत असलेल्या पावसामुळे पुन्हा लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या 10-15मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मध्य मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. तर मुंबई उपनगरात पावसाने विश्रांती घेतली आहे.