
दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा शहापूर तालुक्यातील प्रकार ताजा असतानाच त्याचीच पुनरावृत्ती आज सायंकाळी मोखाडा तालुक्यात घडली. आश्रमशाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पूनम नावळा या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये दोरीने गळफास घेतला. मूळ गावाच्या नजीक असलेल्या नावळाचा पाडा येथील पूनम मोखाडा येथील महर्षी रामजी शिंदे आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.



























































