
पुख्यात मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर ठाणे पूर्वेच्या कोपरीत भाजी मार्पेट येथे तिघा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून जखमी नाडरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे ठाणे पूर्वेत एकच खळबळ माजल्याने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
कोपरी परिसरातील सिद्धार्थनगर भागात पुख्यात मटकाकिंग बाबू नाडर याचा गेल्या अनेक वर्षांपासून मटका आणि जुगाराचा अड्डा आहे. पोलिसांच्या कारवाईच्या बडग्यानंतरही नाडर त्याचा मटका अड्डा बिनबोभाट सुरू करतो. त्यामुळे नेहमीच वादग्रस्त असलेल्या बाबूवर अत्यंत गजबजलेल्या कोपरी भाजीमार्पेटमध्ये धारदार शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी हल्ला केल्याने गहजब झाला. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली होती. त्यानुसार सनी तेलुरे, हरीश तेलुरे आणि स्वप्नील तेलुरे या भावांना पोलिसांनी अटक केली. बाबू आणि सनी यांच्यात वाद झाला होता. यावेळी बाबूने सनीला मारहाण केली होती. त्याच रागातून सनीने दोन भावांच्या मदतीने बाबूवर जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सनीवर आधीच दहशत माजवणे, खुनाचा प्रयत्न करणे, हाणामारी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.




























































