कश्मीरमध्ये 275 दहशतवादी दबा धरून बसलेत, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनंतर हल्ल्याचा कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱयात 275 दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. या दहशतवाद्यांची माहिती मिळाली असली तरी त्यांचा सुगावा अद्याप लागलेला नाही. सध्या अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा सुरू आहे. त्यानंतर कश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याचा त्यांचा कट असल्याचे गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. पण त्या आधीच त्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्न करत आहेत.

कश्मीरच्या खोऱयात दूरवर विखुलेल्या वस्तीमुळे आणि स्थानिकांच्या असहकारामुळे गुप्तचर विभाग आणि पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही. कश्मीरमध्ये लपलेले हे दहशतवादी कोणतीही दहशतवादी कारवाई करत नसल्यामुळे त्यांचा सुगावा लावणे कठीण जात आहे. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. महासभेनंतर हल्ल्याचे आदेश दिले आहेत.