ग्वालिअरमध्ये मिग कोसळले; दोन्ही वैमानिक सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान हवाई दलाचे मिग-21 हे प्रशिक्षण देणारे लढाऊ विमान भिंड जिल्ह्यात कोसळले. वैमानिकांनी प्रसंगावधान राखून पॅराशूटचा वापर केल्याने ते बचावले. ग्वालिअर हवाई तळावरून नियमित सरावासाठी या विमानाने उड्डाण केले होते.  भिंड जिल्ह्यातील ‘चौधरी का पुरा’ या भागात आज सकाळी 10 वाजता हे विमान कोसळले. त्यानंतर काही वेळाने हवाई दलाचे बचाव पथक हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले. यातील एक वैमानिक जखमी झाला आहे. दोन्ही वैमानिकांवर प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला यासाठी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.