1 / 8
चौथ्या सिझनमध्ये झळकलेल्या अभिनेत्री डॉली बिंद्रा एवढ्या भांडायच्या की प्रेक्षकांनाही त्यांचा कंटाळा आला होता. डॉलीचे मनोज तिवारी, श्वेता तिवारी, अश्मित पटेल यांच्यासोबत भांडणं झाली होती.
सहाव्या सिझनमध्ये झळकलेल्या इमाम सिद्दीकीचे फक्त स्पर्धकांसोबतच नाही तर सलमानसोबतही भांडण झालेले. त्याने घरात देखील तोडफोड केली होती.
कमल राशिद खान याने तिसऱ्या सिझनमध्ये फॅशन डिझायनर रोहिम वर्मावर बॉटल फेकून मारली होती. त्यानंतर बिग बॉसने केकेआरला हाकलून लावले होते.
बिग बॉसचा पाचवा सिझन सुरू झाल्यापासून पूजा मिश्राने इतर स्पर्धकांच्या नाकीनाऊ आणले होते. पूजा फार रागीट होती व तिच्या या स्वभावाचा इतर स्पर्धकांनाही त्रास व्हायचा.
प्रियंका जग्गा ही सिझन 10 ची सर्वात वादग्रस्त स्पर्धक होती. तिने शोमध्ये खूप भांडणं व शिवीगाळ केली होती. त्यामुळे सलमान खानने स्वत: तिची शोमधून हकालपट्टी केलेली.
राजा चौधरी आणि संभावना सेठ या दोघांची बिग बॉसमध्ये अनेकांशी भांडणं झाली. हे दोघेही आपआपसात खूप भांडले व शिवीगाळही केलेली. त्यानंतर या दोघांमध्येच लव्ह अँगल सुरू झाला होता.




























































