बारा मतदासंघात तरुणांची संख्या वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dfd

जिल्ह्यातील बारा मतदारसंघात यावेळी तरुण मतदारांची संख्या वाढली असून 45 टक्के मतदार हे चाळीस वर्षाच्या आत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीमध्ये 18 लाख 5 हजार 526 पुरुष, 16 लाख 62 हजार 834 महिला व 162 इतर असे एकूण 34 लाख 68 हजार 522 मतदार आहेत. यामध्ये तब्बल 45 टक्के मतदार हे वय वर्ष चाळीशीच्या आतमधील आहेत. जिल्ह्यातील बारा मतदारसंघामध्ये मिळून 18 ते 19 या वयोगटातील 80 हजार 38 मतदार आहेत. हे सर्व मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर, 20 ते 29 या वयोगटातील मतदारांची संख्या 7 लाख 20 हजार 685 असून यापैकी काही मतदारांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमधील तरुण मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने आगामी काळात या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तरुणांशी संबंधित असलेल्या बेरोजगारी, शैक्षणिक, अशा मुद्द्यांवर भर द्यावा लागणार आहे.

‘ऐंशी’पारची संख्या लाखावर
जिल्हा निवडणूक शाखेतून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील बारा मतदारसंघामध्ये मिळून असलेल्या एकूण मतदारांमध्ये वय वर्ष ऐंशी व त्यापेक्षा जास्त वय असणार्‍या मतदारांची संख्या 1 लाख 12 हजार 385 आहे. यामध्ये 80 ते 89 या वयोगटातील मतदार हे 94 हजार 635 असून उर्वरीत 17 हजार 750 मतदारांचे वय हे नव्वदीपेक्षा जास्त आहे.

वयोगटानुसार असे आहेत मतदार 
18 ते 19 वयोगट : 80 हजार 38
20 ते 29 वयोगट : 7 लाख 10 हजार 685
30 ते 39 वयोगट : 7 लाख 70 हजार 410
40 ते 49 वयोगट : 7 लाख 19 हजार 740
50 ते 59 वयोगट : 5 लाख 32 हजार 988
60 ते 69 वयोगट : 3 लाख 40 हजार 714
70 ते 79 वयोगट : 2 लाख 1 हजार 562
80 ते 89 वयोगट : 94 हजार 635
90 ते 99 वयोगट : 15 हजार 848

वय वर्ष 99 च्या पुढील मतदार : 1 हजार 902