राजकारणाची पातळी घसरल्यानं अजित पवार नाराज – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp president sharad-pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषद घेतली

  • आम्ही सर्व एका विचाराने वागतो
  • आमच्या कुटुंबात यत्किंचितही वाद नाहीत
  • कुटुंबप्रमुख म्हणून मी यात लक्ष घालणार आहे
  • राजीनामा दिल्याआधीही चर्चा केली नाही आणि दिल्यानंतरही चर्चा केली नाही
  • राजीनाम्याचं कारण मलाही जाणून घ्यायचं आहे
  • आताचे राजकारण काही खरे राहिले नाही; हे बंद करून आपण आपली शेती,व्यवसाय केलेला बरा तेच करूया, असा सल्ला अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवारला दिला आहे.
  • राजकारणाची पातळी घसरल्याने अजित नाराज होते
  • माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ होते
  • अजित पवार यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला – शरद पवार
  • अजित पवार यांनी आज राजीनामा देण्यासंदर्भात चर्चा केली नव्हती. कारण आम्हाला कळलेले नाही
  • त्यामुळे आम्ही त्यांच्या विनंतीनुसार न जाण्याचा निर्णय घेतला.
  • महाराष्ट्रातील कायद्या सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे आपण तिथे जाऊ नये असे त्यांनी सांगितले.
  • मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी विनंती केली की ईडीच्या कार्यालयात आपण जाऊ नये, त्या ठिकाणी 144 कल लागू केले आहे.
  • राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आता बैठक झाली