
ग्राहकांना मुली पुरवत असल्याची टिप मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी गेले परंतु त्याच्याकडून केवळ गांजा जप्त करण्यात यश मिळाले. या प्रकरणी लातुरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पेट्रोलिंग करीत असताना नाईक चौकाजवळ विशाल भालेराव नावाची व्यक्ती ग्राहकांना मुली पुरवण्याचे काम करीत असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे तिथे गेल्यानंतर चौकात लाल पिशवी घेऊन उभा असलेल्या विशाल याची पोलिसांनी चौकशी केली असता तो घाबरला. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपल्याकडील पिशवीत गांजा असल्याचे कबूल केले. सदरील गांजा त्याला रेणापूर येथील राहूल बालाजी मामडगे याने दिल्याचे सांगीतले. १ किलो १८१ ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याजवळ सापडला. या प्रकरणी दोघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


























































