साखर मोहल्ला सरपंचांसह सर्व सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील साखर मोहल्ला ग्रामपंचायतीतील सरपंच यासिन मुजावर यांच्यासह सर्व सदस्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे शिवसेना उपनेते, आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत स्वागत केले. साखर मोहल्ला ग्रा.पं सरपंच यासिन मुजावर, सदस्य दिलदार दरवेश, अस्लम गुहागरकर,राजेंद्र जाधव, इनायत शिरगावकर, उस्मान मिरकर, जुबेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योजक रवींद्र सामंत,युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, उपतालुका युवाधिकारी आशु भालेकर, उपविभागप्रमुख अजीम चिकटे, पाली सरपंच नितीन सावंत देसाई उपस्थित होते.