
तालुक्यातील लोनवळ तांडा येथे अंगावर वीज पडल्याने मृत्यूमुखी पडलेल्या प्रवीण राठोड या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी शिवसेना धावून आली आहे.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने राठोड कुटुबांवर आभाळच कोसळले. त्यांना सहकार्य म्हणून वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
तसेच यावेळी भविष्यातही हाक द्या. मदतीला हजर आहोत असा शब्द विनायक मुळे यांनी राठोड कुटुंबाला दिला. यावेळी युवराज शिंदे, नरेंद्र राठोड, वसंत सावंत, महेश जाधव, प्रकाश वजीर, डिंगाबर शिनगारे, विंशवाबर शिनगारेसह शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.





























































