
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असताना काँग्रेसने पहिल्या टप्प्यामध्ये 51 जणांचे उमेदवारी जाहीर केले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या अन्य उमेदवारांचा कोणता समावेश नसल्यामुळे तुल्यबळ उमेदवार मिळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा
काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने एकत्रपणे विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सर्वत्र सुरू केलेले आहे. निम्म्या जागा या दोघांनीही घेतल्या आहेत व मित्र पक्षांनाही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याअगोदर नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे 6 आमदार (प्रत्येकी 3-3) निवडून आलेले होते. त्यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, राधाकृष्ण विखे यांचा समावेश आहे तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप, राहुल जगताप, वैभव पिचड यांचा समावेश होता. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी कलाटणी मिळाल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या 3 जणांनी आघाडीला रामराम ठोकला आहे. यामध्ये वैभव पिचड, भाऊसाहेब कांबळे आणि राधाकृष्ण विखे यांचा समावेश होता.
सातारा पोटनिवडणूक – राष्ट्रवादी आग्रही, पृथ्वीराज चव्हाणांचा निर्णय लांबणीवर
आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पक्षापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. आजच्या काँग्रेसच्या झालेल्या जागा वाटपामध्ये नगर जिल्ह्यातील फक्त बाळासाहेब थोरात यांचे नाव जाहीर झाले आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यामध्ये काँग्रेसला किती जागा मिळाल्या आहेत, याबाबत कोणतीही भूमिका पक्षाने जाहीर केलेली नाही. त्यामुळे आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला नेमके किती जागा आल्या आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार मिळतात की नाही? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यामध्ये किती जागा सोडायच्या यावर निर्णय जाहीर केलेला नाही. पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. यातच आता राष्ट्रवादीने सुद्धा आता पहिली यादी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. रविवाकरी रात्री उशिराने बहुदा यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसने 51 उमेदवारांची घोषणा केली आहे. #MahaElection #महासामना #विधानसभा२०१९ pic.twitter.com/6rtrjpGZzo
— Saamana (@Saamanaonline) September 29, 2019
शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जागा ही काँग्रेसला असल्यामुळे आता राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने या ठिकणी काँग्रेसला उमेदवारी देण्यामध्ये मोठी करसत करावी लागणार आहे. वेळप्रसंगी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी देखील काँग्रेसकडून केली जात आहे. श्रीरामपुरमध्ये भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसने त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायाची यावरुनच मत-मतांतर असल्यामुळे तेथे सुध्दा काँग्रेसला तुल्यबळ उमदेवारी मिळणार की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे.

























































