
मराठी आणि हिंदी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि शोलेत कालियाची भूमिका बजावणारे विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 77 वर्षाचे होते. गावदेवी येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विजू खोटे यांनी हिंदी आणि मराठी 300 चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री शुभा खोटे यांचे ते ज्येष्ठ बंधू. शोले चित्रपटात त्यांनी कालिया या दरोडेखोराची भूमिका बजावली होती. त्यात ‘सरदार मैने आपका नमक खाया है’ हा त्यांचा डायलॉग गाजला. 1990 च्या दशकात त्यांनी अंदाज अपना अपना या चित्रपटात रॉबर्टची भूमिका बजावली होती. विजू खोटे यांच्या काकू दुर्गा खोटे या हिंदी चित्रपटसृष्टीत नावजलेल्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.



























































