काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार गोपालदास अग्रवाल भाजपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. गोंदियाचे काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी कमळ घेतले हाती घेतले.

निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेशसाठी रांगा लागल्या आहे. सोमारी गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, विधीमंडळातील लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि गोंदियाचे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री परिणय फुके आदी. उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोपालदास अग्रवाल गेल्या पाच वर्षात शरीराने जरी काँग्रेसमध्ये असले तरी मनाने भाजपमध्ये होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आघाडी सरकारच्या काळातील अनेक स्फोटक प्रकरणे शोधली आणि ती विधी मंडळाच्या पटलावर आणली. त्याचा राज्यकारभार सुधारण्यास निश्वितच फायदा झाला.