
गुजरातमध्ये अंबाजीच्या दर्शनासाठी जाताना भाविकांची बस दरीमध्ये कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 14 पुरूष, 3 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. अद्यापही 5 जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सायंकाळी अंबाजी जवळील त्रिशुलिया घाटजवळ भाविकांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळली. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 50 पेक्षा जास्त प्रवासी होते. पावसामुळे समोरची दृश्यमानता धुसर झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट शेकडो फूट खोल दरीमध्ये कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी मृतांचा खच पडला होता. दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
SG Shah, Additional District Health Officer on bus accident in Banaskantha, Gujarat: Death toll has risen to 18 https://t.co/ZbhGD6vtoS
— ANI (@ANI) September 30, 2019
मोदी-शहांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या भीषण दुर्घटनेप्रती शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्वीट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. मृतांच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त केली. तसेच अपघातातील जखमी लोकांच्या चांगल्या तब्येतीसाठी इश्वराकडे प्रार्थनाही केली.
Devastating news from Banaskantha. I am extremely pained by the loss of lives due to an accident. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families.
The local administration is providing all possible help to the injured. May they recover soon.
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2019





















































