जम्मू कश्मीरमध्ये चकमक; चार दहशतवादी ठार, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये वेगवेगळ्या भागात दहशतवादी आणि सुरक्षादलांत चकमक उडाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. राज्यातील गांदरबल आणि रामबन जिल्ह्यात उडालेल्या चकमकीदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले. रामबनमध्ये दहशतवाद्यांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. या  भागात अजून दोन दहशतवादी लपल्याची माहिती आहे.

रामबन भागात जेव्हा दहशतवाद्यांनी एका कुटुंबाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. परंतु एक जवान शहीद झाला. तसेच दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामबन जिल्ह्यातील बटोत भागात दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या कुटुबींयांना त्यांच्याच घरी ओलीस ठेवले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने या घराला घेराव घालून कुटुबींयांची सुटका केली.