
सध्या नवरात्र सुरू आहे. अनेक भाविक या उत्सवादरम्यान कडक उपवास ठेवतात. उपवासामुळे काहींची तब्येत बिघडके तर काहींना अशक्तपणा जाणवतो. तासनतास पाणी न प्यायल्याने किंवा काहीच न खाल्ल्याने शारीरीक त्रास होणे स्वाभाविक आहे. या उपवासाचे अनेक फायदेही आहे. परंतु उपवासादरम्यान आहार योग्य ठेवल्यास हा शारीरिक त्रास आपल्याला टाळता येईल.
- दिवसाची सुरूवात तुम्ही ग्रीन टी घेऊन करू शकता. त्यानंतर काही खजूरही खाऊ शकता.
- सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही काही फळांचा आहार घ्या. काही सुका मेवा घेतला तरी चालेल.
- त्यानंतर मिल्क शेक किंवा नारळ पाणी चांगले राहील.
- दुपारी जेणात साबुदाना खिचडी आणि एक ग्लास ताक घ्यावे. बीपीचा त्रास असेल तर ताकात सैंधव मीठही टाकू शकता.
- जेवणाच्या तासाभरानंतर थोडेसे दही खाल्लेले चांगले.
- झोपण्यापूर्वी एक ग्लास दुध घेतल्यास आहार चांगला राहील.

























































