
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये भाजपने लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीला लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी विरोध केला आहे. निलंगेकर यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला. तीन तासांपासून महामार्ग रोखून धरल्यन दोन्ही बाजून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

























































