
देशातील स्वच्छ सर्वेक्षणात अंधेरी हे उपनगरीय स्थानक सर्वाधिक स्वच्छ स्थानक ठरले आहे. तर विरार स्थानकाचा दुसरा क्रमांक लागला आहे.
रेल्वे मंत्रालयाने नुकतंच स्वच्छ सर्वेक्षण हाती घेतले होते. त्यात जयपूर स्थानकाला 931.75 गुण मिळाले असून देशातील सर्वात स्वच्छ स्थानक ठरले आहे. जयपूर नंतर जोधपूर आणि दुर्गापूर या स्थानकांचा क्रमांक लागला आहे. बुधवारी गांधी जयंतीनिमित्त हा अहवाला प्रकाशित करण्यात आला
स्वच्छता सर्वेक्षणात 109 उपनगरीय स्थानकांचेही सर्वेक्षण करण्यात आले होते. यात अंधेरी स्थानकाचा पहिला क्रमांक लागला आहे. तर दुसरा क्रमांक विरार आणि तिसरा क्रमांक नायगाव स्थानकाचा लागला आहे.
रेल्वे मंत्रालयाने 2016 साली 407 स्थानकाचे ऑडिट आणि स्वच्छता रँकिंग जारी केली होती. यंदा रँकिंगमध्ये स्थानकांची संख्या वाढवण्यात आली होती. यंदा 720 स्थानकांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला होता. यंदाच्या सर्वेक्षणात पहिल्यांदा उपनगरीय स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात जयपूर सर्वाधिक स्वच्छ स्थानक ठरले आहे.
























































