
#MahaElection कुडाळ तालुक्यातील नारूर गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आबा कुणकेरकर यांनी स्वाभिमानला रामराम करीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुणकेरकर यांनी गुरूवारी कुडाळ येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वैभव नाईक यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.
कुणकेरकर कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जात होते. ग्रा.पं.सदस्य तसेच सोसायटीचे सदस्य पदावर त्यांनी काम केले आहे. मात्र गुरूवारी त्यांनी स्वाभिमानला रामराम करीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार नाईक यांनी शिवसेनेत स्वागत करून निश्चितच मान सन्मान दिला जाईल अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे माध्यमातून झालेली विकासकामे, आमदार वैभव नाईक तसेच जि.प.सदस्य नागेंद्र परब यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे यावेळी कुणकेरकर यांनी यावेळी सांगत यापुढेही शिवसेनेशी ठाम उभे राहणार आहे. वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी पं.स.सदस्य आनंद भोगले, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, रांगणा तुळसुलीचे सरपंच नागेश आईर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

































































