हिंदुस्थानी क्षेपणास्त्रामुळेच पडलं हवाई दलाचं विमान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थानच्या हवाई दलाचे MI-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्या दुर्घटनेत सहा जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ते हेलिकॉप्टर हवाई दलाच्या चुकीमुळेच कोसळल्याचे कबुली हवाई दलाचे नवे प्रमुख राकेश कुमार सिंग भदौरिया यांनी दिली आहे. त्या दुर्घटनेची चौकशी नुकतीच पूर्ण झाली असून ते विमान हवाई दलाच्या दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे ती भयंकर दुर्घटना घडल्याचे समोर ले आहे.

‘ती आमची खूप मोठी चूक होती. त्यासाठी दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. नुकताच त्या दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार त्यात हवाई दलाच्या दोन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सहा जवानांना जीव गमवावा लागला.’, असे भदौरिया यांनी सांगितले.