बंदर, गोदी कामगारांना घसघशीत बोनस; दसऱ्यापूर्वीच खात्यात जमा होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

देशातील प्रमुख बंदरांतील बंदर आणि गोदी कामगारांना दिवाळीचा घसघशीत बोनस मिळणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना 19.86 टक्के म्हणजेच 16 हजार 683 रुपये बोनस मिळणार आहे. दसऱयापूर्वी म्हणजेच 7 सप्टेंबरलाच बोनस मिळणार आहे.

कामगारांच्या बोनस संदर्भात अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेटये आणि जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय नौकानयन मंत्रालय आणि इंडियन पोर्ट असोशिएश़नने सर्व बंदरांच्या अध्यक्षांना बोनस देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील कामगारांच्या बोनससाठी 12 कोटी 5 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून सर्व बंदरातील कामगारांसाठी 45 कोटी 69 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.