प्रगती एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा दहा दिवसांसाठी रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने दक्षिण पूर्व घाटात मंकी हिल आणि कर्जत सेक्शनमध्ये अप लाइनवर पायाभूत कामांसाठी दहा दिवसांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे धावणाऱया लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मुंबई ते पुणे मार्गावरून धावणारी प्रगती एक्स्प्रेस पुढील दहा दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रांतील काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे तसेच रुळांवरील खडी वाहून गेल्यामुळे रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी भरपावसात रेल्वेने दुरुस्तीचे काम केले होते. मात्र काही ठिकाणी महत्त्वाची कामे अद्यापही शिल्लक आहेत. ही दुरुस्तीचे कामे पुढच्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील लांबपल्ल्याची वाहतूक दहा दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावरून धावणारी प्रगती एक्स्प्रेस पुढील दहा दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहेत.