पेन्शनधारकांचे गुरुवारी देशव्यापी धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील हजारो पेन्शनधारकांना ईपीएफ-95 च्या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. मात्र त्यांना महिन्याला कमीत कमी नऊ हजार रुपये पेन्शन मिळावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे देशभरातील ईपीएस निकृत्तांमध्ये असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी निवृत्त कर्मचारी (1995) समिती, नागपूर यांनी देशातील सर्व भविष्य निर्वाह निधी  कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्या आंदोलनात पेन्शनरधाकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन कर्मचारी निवृत्तीवेतन (1995) समन्वय समिती, राष्ट्रीय संघटना नागपूरचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश पाठक यांनी केले आहे.