कराड उत्तरमध्ये 6 उमेदवार रिंगणात, 5 जणांची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड उत्तर विधानसभा मतदार संघांमध्ये 11 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात 6 उमेदवार राहिले आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपचे मनोज घोरपधे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केली आहे. तर रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम यांना पाठिंबा दिला आहे. कराड उत्तरमध्ये 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.

जगन्नाथ वाघमारे (बसपा – हत्ती), धैर्यशील कदम (शिवसेना – धनुष्यबाण), शामराव उर्फ बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – घड्याळ), सुभाष पिसाळ (वंचित – गॅस सिलेंडर), जगन्नाथ सोनावले (अपक्ष – हेलिकॉप्टर), मनोज घोरपडे (अपक्ष – कप आणि बशी) या उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब पाटील, अपक्ष मनोज घोरपडे या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.

साजिद मुल्ला (अपक्ष), सचिनकुमार नलवडे (अपक्ष), संतोष कमाणे (अपक्ष), विनोद बागल (अपक्ष) व भानुदास पोळ (अपक्ष) या 5 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विदुयत वरखेडकर यांनी दिली.