
मुंबई डबेवाला असोसिएशनने विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘मामा’ या शब्दाचा वापर करून डबेवाल्यांची हेटाळणी केली जायची, परंतु शिवसेनेने आपल्या स्टाइलने उत्तर देऊन ही हेटाळणी बंद केली.
डबेवाल्यांचा अपमान करणारे रोहिंग्टन मेस्त्री या कॅनडाच्या लेखकाचे पुस्तक मुंबई विद्यापीठात अभ्यासाला होते. शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढायला लावले. डबेवाल्यांचा स्वाभिमान जपण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या मागे काल आणि आजही उभे आहेत, तसेच भविष्यातही उभे राहतील असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे. डबेवाल्यांच्या पाठिंब्याचा परिणाम मुंबई, मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर या उत्तर पुण्यातील भागांत नक्की जाणवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



























































