
दसऱयाच्या शुभमुहूर्तावर वाहनांची नोंदणी करून ते घरी नेण्याची प्रथा असते. यंदा मुंबईतील आरटीओ कार्यालयात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची नोंदणी झाल्याने ऑटो क्षेत्रातील मंदीची झळ बसल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चारही आरटीओतून 608 वाहनांची नोंदणी झाली होती, तर यंदा दसऱयाच्या मुहूर्ताला आरटीओत केवळ 298 वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 310 वाहनांची नोंदणी कमी झाली आहे.
वडाळा आरटीओत गेल्या वर्षी दसऱयाच्या मुहूर्तावर 199 नव्या वाहनांची नोंदणी झाली होती. त्यातून सरकारच्या तिजोरीत 96 लाख 36 हजार 185 रुपयांचा महसूल मिळाला होता. याउलट या वर्षी वडाळा आरटीओत केवळ 42 वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून सरकारला केवळ 9 लाख 7 हजार 434 रुपयांचा महसूल मिळाला आहे. ताडदेव आरटीओमधील वाहन नोंदणीत मात्र काही प्रमाणात वाढ दिसून आली. ताडदेव आरटीओत गेल्या वर्षी 33 वाहनांची नोंदणी झाली आहे. ताडदेव आरटीओमध्ये आज 41 वाहनांची नोंदणी झाली होती. तर अंधेरी आरटीओत गेल्या वर्षी अंधेरी 81 वाहनांची नोंदणी झाली होती, तर यंदा केवळ 18 वाहनांची नोंदणी झाली आहे.
महसुलातसुद्धा घट
2018 2019
अंधेरी – 74, 30, 318 12,38,459
वडाळा – 96,36,185 90,74,34
ताडदेव – 33,34,141 15,89,353
दसऱयाच्या दिवशी वाहन नोंदणी
आरटीओ 2018 2019
अंधेरी 81 18
वडाळा 199 42
ताडदेव 33 41
बोरिवली 295 197
एकूण 608 298

























































