राज्यातील  वीज वाहिन्या होणार सक्षम, महापारेषण 1317 कोटी रुपये खर्च करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity

राज्याच्या कानाकोपर्‍यापर्यंत वीज वाहून नेण्यासाठीची वीज वाहिन्यांबरोबरच संपूर्ण वीज वितरण यंत्रणा आणखी सक्षम होणार आहे. त्यासाठी महापारेषण नवीन उच्च दाब वीजवाहिन्या टाकणे, जुन्या वीजवाहिन्या बदलणे, ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी 1317 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये तयार होणारी वीज महावितरणसह राज्यातील अन्य वीज वितरण कंपन्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी महापारेषणवर आहे. सध्या राज्याची विजेची मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.