
बीड शहर हादरवून सोडणाऱ्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुज्जर खान याला जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. गुज्जर हा हैदराबादमधून विदेशात फरार होण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
बीड मधील 0एका शाळेवर नोकरीस असलेले शेख साजिद यांचा हॉटेलवर दिवसाढवळ्या चार ते पाच जणांनी निर्घृण खून केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गुज्जर खान होता. घटनेच्या दिवसापासून तो फरार होता. त्याच्या अटकेसाठी बीड पोलिसांच्या वतीने चार पथके तयार करण्यात आली होती. राजस्थान, हैदराबाद, गुजरात आणि दिल्ली या ठिकाणी ही चार पथके कार्यरत होती.
गुज्जर हा बीडमार्गे हैदराबाद तेथून दिल्ली नंतर अजमेर, माऊंट आबु व तेथून मेहसणामार्गे गुजरातच्या अहमदाबाद येथे गेला, त्यानंतर तो पुन्हा बीडला आल्याची माहिती मिळाल्यानंतर बीड येथे पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी रात्री त्याला जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.


























































