… तरीही उदयनराजे लाखांनी पराभूत होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसह साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उदयराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले आहे. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते सिक्कीमचे राज्यपालही होते.

साताऱ्यात प्रचार शिगेला पोहोचला असतानाच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयराजेंना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. प्रचारसभेत बोलताना त्यांनी उदयनराजे दोन लाख मतांना पराभूत होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट, उदयनराजेंचा मोठा गौप्यस्फोट

ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला. मोदी किंवा शहा जरी प्रचाराला आले तरीही उदयनराजे दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत. कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

कराड-सातऱ्याचा चुरशीचा सामना
कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांविरोधात भाजपने विलासराव देशमुख यांचे जावई अतुल भोसले यांना तिकीट दिले आहे. तर साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात महाआघाडीतर्फे श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

Photo – उदयनराजे -शिवेंद्रसिंहराजेंनी पदयात्रेद्वारे केली प्रचाराची सुरुवात