हिंदू राष्ट्र सेनेचा शिवसेनेला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदूराष्ट्र सेनेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना मंगळवारी पाठींबा दिला आहे. या पाठिंब्याबद्दल शिवसेनेने त्यांचे आभार मानले आहेत. नगर शहरातून शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आरपीआयपाठोपाठ आता हिंदु राष्ट्र सेनेनेही राठोड यांना पाठिंबा दिला आहे. हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी यांनी मंगळवारी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याबाबतचे पत्र दिले आहे.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवासेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, महिला आघाडीच्या सुजाता कदम, यांच्यासह हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही वर्षापासून हिंदू राष्ट्र सेनेने नगर जिल्ह्यामध्ये मोठी चळवळ उभी केली आहे. नगर शहरामध्ये त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.