आयर्नमॅन 70.3 गोवाच्या रेसबाबत नताशा उत्सुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहा वेळा आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियन आणि रेड बुल अथलेट नताशा बॅडमन हिने सांगितले की, गोव्यात होणाऱ्या आयर्नमॅन 70.3 च्या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी ती उत्सुक आहे. ही रेस गोव्यामध्ये रविवारी 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मंगळवारी हॉटेल मॅरियट येथे आयोजित पत्रकार परिषदेत नताशा यांनी ही माहिती दिली आहे. आयर्नमॅन 70. 3 गोवा मार्ग पाहून त्याबद्दल त्यांनी या परिषदेत आनंद व्यक्त केला. “पोहण्यासाठी समुद्र चांगला आहे आणि सायकल चालविण्यासाठी आणि रनिंगसाठी निवडलेले रस्तेही चांगले दिसतात, तरी गोव्यातील उष्णता आणि आर्द्रतेची सवय लागावी लागेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

नताशा या रेसिंगमधील बादशाह आहेत. त्यांनी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप सहा वेळा जिंकली आहे. ‘स्विस स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर’चा किताब त्यांनी दोन वेळा मिळवला आहे. आयर्नमॅन ट्रायथलॉन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला नसल्या तरी सहा वेळा त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. 1998, 2000, 2001, 2002, 2004 आणि 2005 साली त्यांनी हवाई आयर्नमॅन स्पर्धा जिंकली आहे. तीनपेक्षा अधिक वेळा आयर्नमॅन स्पर्धा जिंकणाऱ्या इतिहासातील चार महिलांपैकी तीनपेक्षा अधिक वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या त्या आहेत.

ट्रायथलॉनसाठी असणाऱ्या हायड्रेशन आणि न्यूट्रिशनसारख्या गरजांबाबत नताशा म्हणाल्या, हाय इंटेनसिटी ट्रेनिंगच्या जागच्या जागी योग्य न्यूट्रिशन प्लॅन असणे. आयर्नमॅन इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी न्यूट्रिशन आणि हायड्रेशन अत्यंत महत्वाचे आहे. रेड बुलचे सेवन प्रशिक्षणादरम्यान मला खूप मदत करते. रेड बुलमध्ये इन्ग्रेडीयंटस त्यात कॅफिन आणि जीवनस्तवासह विविध प्रकारचे घटक आहेत जे माझ्या ऊर्जा आणि कार्यक्षमतेस चालना देतात. रेड बुल अथलेट नताशा बॅडमन यांनी त्यांच्या ट्रेनिंग डायटबद्दल सांगताना सांगितले, गेले वर्षभर मी तळलेले पदार्थ आणि मांसाहारी जेवण अजिबात खात नाही. मी बर्‍याच भाज्या आणि फळे, परंतु कार्बोहायड्रेट आणि प्रथिने खाऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करते. एका शर्यतीच्या आठवड्यापूर्वी, मी चार दिवस कमी कार्ब्स खाते आणि नंतर शर्यतीच्या तीन दिवस आधी कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढवते आणि भाजीपाला आणि प्रथिनांचे प्रमाण कमी करते.

ट्रायथलॉन इंडिया आणि आयर्नमॅन स्पर्धांमधील वाढत्या प्रतिसादाबद्दल त्या म्हणाल्या, हिंदुस्थानात होणाऱ्या पहिल्या आयर्नमॅन 70.3 च्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 800 पेक्षा अधिक ट्रायथलेट्सनी सहभाग नोंदवल्याने माझी उत्सुकता वाढली आहे. हिंदुस्थानात फिटनेस आणि क्रिडा क्षेत्रातील वाढती आवड यामुळे लक्षात येते. आतापर्यंत माझ्या कारकीर्दीत यश संपादन करीत थरारक क्षण अनुभवल्यानंतर अधिकाधिक लोकांना आयर्नमॅन उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देण्याचे माझे ध्येय आहे.

आयर्नमॅन 70.3 रेसचे संचालक आणि 20 वेळा आयर्नमॅन रेस पूर्ण केलेले दिपक राज सुद्धा या पत्रकार परिषदेत होते. ते म्हणाले, रेससाठी मिळालेला भारतीय अथलेट्सचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. आमची शर्यत केवळ 27 दिवसात पक्की झाली. पदार्पण करणार्‍या देशातील कोणत्याही पहिल्या आयर्नमॅन स्पर्धेसाठीची ही सर्वात जलद नोंदणी आहे. दीपक म्हणाले की, आयर्नमॅन गोवा 70.3 शर्यतीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या ‘फिट-इंडिया’ चळवळीत आमचे नम्र योगदान असल्याचे दीपक म्हणाले. दिपक यांनी बोलताना नताशा यांच्या आयर्नमॅन अथलेट चॅम्पियनसह इतर आचिव्हमेंटबद्दलही सांगितले आणि आयर्नमॅन रेसच्या उद्घाटनासाठी त्या आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.