फ्लिपकार्टवर घ्या व्हिडीओचा आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील आघाडीची ई-कॉमर्स बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडीओ ओरिजिनल्स’चा शुभारंभ करून ओरिजिनल व्हिडीओ कंटेंटच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अकॅडमी अर्वॉर्ड विजेत्या गुनीत मोंगा या ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ शी जोडली जोडली जाणारी पहिली व्यक्ती आहे. निर्माती आणि क्युरेटर या नात्याने नव्या युगातील गोष्टी आधुनिक मांडणीतून त्या लाखो प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. आजच्या ग्राहकांची मनोरंजनाची गरज लक्षात घेऊन, मोबाईल वापरकर्त्याला नजरेसमोर ठेवून कमीत कमी वेळेत अधिक उत्कंठा निर्माण करणारे, आकर्षक क इंटरॅक्टिक्ह कंटेंट ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.