आष्टीत 64 टक्के मतदान, मतदान शांततेत संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकीस सोमवार 21 रोजी सकाळी 7 वाजता सुरवात होऊन 6 वाजेपर्यंत तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. आष्टी, पाटोदा , शिरूर मतदारसंघात एकूण 64.54 टक्के मतदान झाले . मतदारसंघात एकूण 3,70,450 मतदार असून 2,39,073 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात सकाळी पावसाच्या सरी येत होत्या. त्यामुळे 10 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसून आली परंतु पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

आष्टी विधानसभा मतदारसंघात 438 मतदान केंद्र असून यापैकी जामगाव (2) व देवीगव्हाण, सोलेवाडी येथील प्रत्येकी एक अशी एकूण चार मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.केंद्रावर होणारे मतदान शांततेत पार पडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता. एकूण 438 मतदान केंद्रे असून 50 अधिकारी, 1752 कर्मचारी, 170 राखीव कर्मचाऱ्यांबरोबरच 421 पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस दलाच्या 90 जवानांचा ताफा, 280 होमगार्ड तैनात करण्यात आले होते. एका मतदान केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

मतदानाची आकडेवारी
एकूण मतदार-
पुरुष मतदार – 196854
स्त्री मतदार – 173596
इतर – 0
एकूण – 370450

झालेले मतदान
पुरुष- 130547
स्त्री- 108526
इतर- 0
एकूण – 239073
टक्केवारी- 64.54

या केंद्रात फक्त महिलाच कर्मचारी
आष्टी शहरातील पंचायत समिती हद्दीत येणाऱ्या 208 क्रमांकाचे मतदान केंद्र महिलांसाठी विशेष सखी मतदान केंद्र म्हणून राखीव होते या मतदान केंद्रावर महिला कर्मचारी नियुक्त होते.