
प्रवाशाचा मोबाईल चोरून पळणाऱया चोरटय़ाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. नूर इस्लाम जहांगीर शेख असे त्याचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वी तक्रारदार हे माहीम रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 6 येथून प्रवास करत असताना नूर इस्लामने त्यांच्या हातावर फटका मारून मोबाईल खाली पडला. मोबाईल पाडल्यावर तक्रारदाराने लोकलमधून उडी मारून नूर इस्लामचा पाठलाग सुरू केला. फलाटावरून पळत असताना त्याला प्रवाशांनी पकडले. याची माहिती मिळताच वडाळा रेल्वे घटनास्थळी आले. पोलिसांनी नूरकडून एक लॅपटॉप, तीन मोबाईल जप्त केले. त्याच्या अटकेमुळे तीन गुह्यांची उकल झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.





























































