
महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण या दोन्ही राज्यातील कोणत्या पक्षाला मतदारांनी कौल दिला हे दिवसाअखेरपर्यंत स्पष्ट होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेना भाजप महायुतीला जबरदस्त आघाडी मिळाली आहे. तसेच राज्यातील बड्या नेत्यांना पहील्या फेरीत आघाडी मिळत असल्याचं चित्र आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील वरळी मतदारसंघातून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तर नागपूर दक्षिण पश्चिम मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे अशोक चव्हाण हे भोकरदन येथून आघाडीवर आहेत. तर नांदेडमधून अशोक चव्हाण यांनीही आघाडी घेतली आहे.
वाचा कोण कोण आघाडीवर
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 11 हजार मतांनी आघाडीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या फरकाने आघाडीवर
मालेगाव बाह्य- शिवसेनेचे दादा भुसे आघाडीवर
कोथरुड – चंद्रकांत पाटील 7 हजार मतांनी आघाडीवर
घाटकोपर पश्चिममधून राम कदम आघाडीवर
येवलामधून छगन भुजबळ 2000 मतांनी आघाडीवर
वांद्रे पश्चिममधून आशीष शेलार 1700 मतांनी पुढे
इस्लामपूरहून जयंत पाटील आघाडीवर
श्रीगोंदामधून बबनराव पाचपुते 1180 मतांनी पुढे
वांद्रे पूर्वमधून विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर
धनंजय मुंडे 4319 मतांनी आघाडीवर
कल्याण ग्रामीणमधून राजु पाटील आघाडीवर
महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले 5395 मतांनी आघाडीवर
श्रीवर्धन आदिती तटकरे 7506मतांनी आघाडीवर
Live Updates साठी पुढील लिंकवर क्लिक करा

































































