
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये पुणे शहरात 8 पैकी 8 जागांवर विजय मिळवून भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडासाफ केला होता. यंदाही महायुतीने 8 पैकी 5 जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र 3 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे.
भाजपाचे उमेदवार आघाडीवर असलेल्या कन्टोन्मेंट, हडपसर मतदार संघातील मताधिकक्य खूपच कमी असल्याने भाजपाच्या गोट्यात धाकधूक वाढली आहे. अजून बऱ्याच फेऱ्या शिल्लक असल्याने त्यामध्ये काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड मतदार संघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.
कसबा येथून भाजपाच्या उमेदवार व महापौर मुक्ता टिळक आघाडीवर आहेत. तर कँटोनमेंटमध्ये भाजपाचे सुनील कांबळे यांना 300 मतांनी आघाडीवर आहेत. पर्वतीमधून भाजपाच्या माधुरी मिसाळ आघाडीवर आहेत. हडपसरमधून भाजपाचे योगेश टिळेकर आघाडीवर आहेत.
खडकवासल्यामधून राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहेत. तर शिवाजीनगर मतदार संघातून काँग्रेसचे दत्ता बहिरट आघाडीवर आहेत. वडगावशेरीमधून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर आहेत.
दरम्यान, तीन जागांवर भाजप पिछाडीवर असले तरी देखील हे कौल आहेत त्यामुळे हे चित्र बदलूही शकते.
































































