
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आले असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला जनतेने कौल दिला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काही ठिकाणी मात्र उमेदवार बंपर मतांनी विजयी झाले आहेत.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून घेतलेली आघाडी कायम राखत उमेदवारांनी दणदणीत विजय साजरा केला. सायंकाळपर्यंत निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार राज्यात चौदा मतदारसंघात जवळपास एकतर्फी निवडणुका झाल्या. या मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी जबरदस्त विजय साजरा केला.
पाहूया कोणते आहेत हे मतदारसंघ –
> बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार 1 लाख 65 हजार 262 मतांनी विजयी
> पळूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे पतंगराव कदम 1 लाख 62 हजार 521 मतांनी विजयी
> मुरबाड मतदारसंघातून भाजपचे किसन काठोरे 1 लाख 36 हजार 40 मतांनी विजयी
> लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे धिरज देशमुख 1 लाख 21 हजार 482 मतांनी विजयी
> भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे अशोक चव्हाण 97 हजार 445 मतांनी विजयी
> बोरिवली मतदारसंघातून भाजपचे सुनील राणे 95 हजार 21 मतांनी विजयी
> मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके 93 हजार 942 मतांनी विजयी
> पनवेल मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर 92 हजार 730 मतांनी विजयी
> कोपरी-पाचपाखडी दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे 89 हजार 300 विजयी
> रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत 87 हजार 335 मतांनी विजयी.
> शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 87 हजार 24 मतांनी विजयी.
> ओलाळा-माजीवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक 84 हजार 8 मतांनी विजयी
> परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील 81 हजार 790 मतांनी विजयी.
> ऐरोली मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक यांनी 78 हजार 491 मतांनी विजय मिळवला
> भोसरी मतदारसंघातून भाजपचे महेश लांडके 77 हजार 567 मतांनी विजयी



























































