दाभोळे पुलावरून मोटरसायकलस्वार कोसळल्याने मृत्युमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

इचलकरंजीवरून गणपतीपुळे येथे जाणार्‍या एका तरुणाचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने तो पुलावरून खाली कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. भुषण संजय माळगे (23, रा. इचलकरंजी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. भुषण हा आपला सहकारी विशाल धुळगुडे याला घेऊन इचलकरंजीवरून गणपतीपुळे येथे मोटरसायकलने येत होता. दाभोळे गावी पुलाजवळ वळणाच्या रस्त्यावर त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि ते पुलावरून खाली कोसळले. यात भुषण हा मृत्यूमुखी पडला तर विशाल धुळगुडे हा जखमी झाला आहे.