
कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरमध्ये एकही गोळी नाही झाडली गेली, एकही मृत्यू झाला नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. कलम 370 हटावल्यानंतर खोर्यात विकास होणार असेही शहा म्हणाले. अहमदाबादमध्ये एका सभेत ते बोलत होते.
शहा म्हणाले की कश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर एकही गोळी झाडली गेली नाही. तसेच अशांत क्षेत्रात कुणाच्याही मृत्यूचे वृत्त नाही. कलम 370 आणि 35ए हटवल्यानंतर कश्मीरमधील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आपले अखेरचे दिवस मोजण्यास सुरूवात केल्याचेही शाह यांनी सांगितले.
कलम 370 हटवल्यानंतर खोर्या रक्तरंजित हिंसाचार होईल सांडेल असे भाकीत काँग्रेसने केला होता. शहा म्हणाले की त्यांना मी सांगू इच्छितो की कश्मीरमध्ये ना गोळी झाडली गेली ना कुठल्या मृत्यूची बातमी आली. कलम 370 आणि 35ए हटवण्यासाठी हिंदुस्थानने एकजूट दाखवली असेही शहा म्हणाले.

























































